करी पादक्रांत रुप तुझे मनोहर, जैसी निशा
नभात पसरली प्रभा, तारकांनी बहरली दिशा
कांती तिची गहिरी, निर्मळ देई मनशांती
परिपूर्ण तिची परिभाषा, लोचने फुलवीत आशा
मखमाली आभा, पसरे इहलोकी हे तप्त
मंद प्रकाश विखरे स्वर्गलोकी हे पर्याप्त
छटा तिची अणुमात्र, घटा बहुतांश पात्र
अनामिके, अदा तुझी करी घायाळ दिनरात्र
कुंतल काक केशकाळा तरुवार
मनी जे मृदु वदन दिसे हळुवार
ध्यानी ते इंदु वसे शितिज पार
निष्कलंक अंतरंग वास्तव्यास शुद्धतेची धार
तुझे मधाळ हे गाल, भाळ हे अगम्य
बोलके डोळे, निश्चल ओष्ठ, मुख सौम्य तु रम्य
हास्य स्थल अंतर्वास, माया तुझी प्रतिछाया
दर्शवत तुझे दिनमान सुजनता पुर्ण अनुमान
चित्त तुझे अविचल हे माझं तर्जुमान
हृदयीं तुझ्या अनुप्रीती, निष्कलंक आहे माझी प्रिती
मुळ कवी: लॉर्ड बायरन /जॉर्ज गॉर्डन बायरन
रुपांतर: समीर खासनीस
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem