हृदयी मर्म माझ्या, परिणयास न येणे कधी अडथळे ह्या एकरंग दांपत्यास
प्रेम हे नसते जेमतेम
नसे होत त्यात अदलबदल
नसे होत त्यात परिवर्तन, हे न वर्तन प्रेमाचे
हो! निग्रह जणू अनुग्रह,
पाहता झंझावाती वादळे, सोसत प्रहार अढळ
हेलकावणारे गलबातासी मार्ग दाखवेल हा प्रेमतारा
अतुल्य प्रेम हे त्याचे रूप, होती गणना ते स्वरुप
चिरतरुण प्रेम नसे समयाचा मिंधा, मधुर ओठ व गुलाबी गाल जे बाधित अंतकाळ
जेव्हा फिरे काळाचा विळा, करे पार खिळखिळा
प्रेम नसतं बांधील वेळ न काळ, एकनिश्चयी, त्यास नाही
अस्ताची संध्याकाळ
केल्यास हे सिद्ध, करीन मान्य मी निर्बुद्ध
नाही माझी कलाकुती, कोणी दिली कधी प्रेमात आहुती
मुळ कवी: सर्वश्रेष्ठ विलीयम शेक्सपिअर
रुपांतर: समीर खासनीस
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem