निळं नितळ तळं
झुळुक झुळझुळ
झ-याची खळखळ हो
पक्षांची वर्दळ
हवेत दरवळ
पानांची सळसळ हो
खोप्यात धडपड
पिल्लांची फडफड
पंखांना नवे बळ हो
उन्हं ती टळटळ
कातळं जळजळ
वाट ती डळमळ हो
क्षितिजे दूर दूर
जीवाला हूर हूर
आभाळं अघळ पघळ हो
चाहूल क्षणोक्षणी
दक्ष हो वनराणी
सांगे ती नभोवाणी हो
रानात खळबळ
खुरांची पळापळ
क्षणात हळहळ हो
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem