स्तब्ध सारी माणसे; जशी सभेत होती
हुंदके नव्या दुखाचे; कंठात घेत होती
बैलं विजेत मेली; पेरी दुबार झाली
जींदगी संकटांच्या; जशी दाढेत होती
घरोघरी चुली; पण डोक जाई उली
माणसे शिवेवर; मृत्यू कवेत होती
दु: खेची कपाळी; मनी आशेची झोळी
तरंगनारी गर्दी; मरण लाटेत होती
शेती कुणास तारी; न होई हलकेभारी
फाटके फाटक्यांना; धीर देत होती
ओंजळीत पांढ-या; बगळयांची छाया
प्रश्नांची रांग उभी; त्यांच्या राखेत होती
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem