अंदाज बांधलेले; चुकलेत सारे आता
सोन्यापरी उद्याचे; हुकलेत तारे आता
जरी पोषितो जगाला; तरी माझेच होई शोषण
वाहू किती जणांचे; डोई मी भारे आता
या वाकल्या मयाली; ना कुणीच वाली
मोडेल बघ कणाही थांबे न वारे आता
मातीत घाम माझा झोपीत राम माझा
कामात येत नाही माझे चुकारे आता
पोटास पीळ माझ्या अन बैलही भुकेला
मेल्यात मजरा झालो येती शहारे आता
बरबाद आन माझी; कर्जात मान माझी
आनखीन काय माझ्या; माथी निखारे आता
जाणीत नाही कोणी ना ऐकती कहाणी
कोणास काय बोलू झालो मुकारे आता
समशान चित्त झाले ना वित्तही मिळाले
मुळास संकटाच्या कीती डवरावे आता
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem