मातीखालचं आटून गेलं रक्त आता
मळा पाहून वेडा झाला भक्त आता
वरचा तर वरचेवर देतो आहे दणके
धरणी बी गरिबावर झाली सक्त आता
दर साल लूटतो सावकार माल माझा
सरकारही खेळते लपंडाव फक्त आता
मदतीच्या नदिला अडावे बांध किती
आखरी घटकातही पेला मात्र रिक्त आता
कृषिच्या ऋषिंच्या योजना तकलादू
दोरीनेच का व्हावा जीव माझा मुक्त आता
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem