जीवन सारे कळलेले
परिपूर्ण अजूनी ना वळलेले
त्या दिवशी उमलली क्रांत कळी
त्या रात्री निद्रा पेटवली
त्या सोन सकाळी मावळले
जीवन सारे कळलेले
त्या दिवशी सागर कोसळला
त्या रात्री नौका जलभरली
त्या सोनसकाळी ओसरले
जीवन सारे कळलेले
त्या दिवशी तारे नभ भिजले
त्या रात्री धरती टवटवली
त्या सोनसकाळी डबडबले
जीवन सारे कळलेले
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem