'माथ्यास सर यावी; तुझ्या पावलांची,
हृदयास सर यावी; तुझ्या भावणांची.
मी यत्न केले; तरीही जमेना,
माझ्यास सर यावी तूझ्या सावल्यांची.'
तू शाक्य मुनि; अरविंदासनी,
सहसा जिथे; नसे जात कोनी.
तू जाणले; तुझ्या जीवनाला,
अन् पार केले; भवसागराला.
परी दुःखितांचा; कैवार करुनी,
तू त्यागले; त्या स्वर्ग सुखाला.
करुणाकरा; तू द्विजन्मुनी..
तू भेदले; मनुच्या श्रमाला,
अन् वेचले तव; नव आश्रयाला.
शुन्यत्वाचा; स्वीकार करुनी,
तू साधले त्या; बुद्धत्वाला,
प्रज्ञाधिका; जातिस्मरुनी..
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem