आई बापांची सेवा,
देवदूतासही वाटे हेवा देवा.
अंजनाची सळी केली करंगळी,
गालवरती लेली इवली काजळी.
दृष्ट लागू नये दृष्टी यावी बाळा,
देवदूतासही …
जे अनुबंधले त्यासी ते जागले,
जे उरी वाहिले त्या परी पाहिले.
तव त्यांनी दिला वंशाला दिवा,
देवदूतासही …
वृद्ध ते जाहले ते कलु लागले,
मुलाबाळांपरी ते दिसू लागले.
प्रेम द्यावे जगी परतीच्या जीवा,
देवदूतासही …
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem