तु जान माणसा; सुजान माणसा,
फुलबागेचे कोणी केले; रान माणसा.
मुठभर माती; वाहुन जाते,
घाण कशी का होते.
आयुष्याची तुर्त जीवा,
धुळदान अशी का होते.
तु असताना घर-दाराची; वान माणसा.
बुद्धीवान तु; शुद्धीवान तु,
ह्या अवनीचे लोन.
स्वत: ला; परि विसरुनी गेला,
तु कोणाचा कोन.
अस्तित्वाने मोठे केले; सान माणसा.
जगातात जे; जागतात जे,
ते सारे विळोनी.
मंजुळ करती ह्या विश्वाला,
प्रेमाने मिळोनी.
अंहवादाला काळीज नसते; छान माणसा
मुर्तरुप हे संयोगी,
वियोगी नश्वरणारे.
सरण्या आधी सुस्मरणाने,
सामयिक वागा रे.
तुझीया ठायी आहे वैभव; यान माणसा.
खंडन मंडन केल्याने,
रे; नुकसान होते.
सर्वांगीन ह्या; सुंदरतेचे
कर्कश गान होते.
जन्मसिध्द अधिकारी तु; निर्वाण माणसा
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem
Dear poet, you have said the right thing. Janmasidhha adhikaari tu nirvana maansaa., Nice work.